का असे वाटते मज, जीवन हे व्यर्थ
काबाडकष्ट करून न मिळे भाकर..
दिवस रात्र एक करुन राबतो काळया मातीत
तरी सतावतो प्रश्न, माझ्या लेकूराना मिळेल का भाकर?
कधी अवकाळी पाऊस, तर कधी शेती मालाला भाव न मीळे
कसे जगावे आयुष्य, सतावतो प्रश्न रात्रभर
जिवन चालले आहे, काळ्याभोर अंधारातून वाट काढत
कधी वाटते जीवन संपवून टाकावे एकदाचे,
मग विचार ऐई, कोण देईल माझ्या पाखरांना मायेची उब...
No comments:
Post a Comment